PostImage

Nikhil Alam

May 21, 2024   

PostImage

News:- Rajgadh ओवर ब्रिज से गिरी यात्री बस, दो की …


Rajgadh News:- 21 मई  (ही. स.)l राष्ट्रीय राजमार्ग 52पर पचोर थाना क्षेत्र में सोमवार - मंगळवार की दरम्यान रात इंदोर से गुन्हा तरफ जा रही तेज रफ्तार बालाजी बस सद्गुरू धाबा के सामने ओवर ब्रिज से नीच गिर गईl वही 40 से अधिक यात्री घायल हो गये l 10 से अधिक की हालत गंभीर बताई गई है l

पुलिस ने मंगलवार को पोस्टमार्टम के बाद शव परिजनों को सौंपे और चालक के खिलाफ गैर-इरादतन हत्या सहित विभिन्न धाराओं में प्रकरण दर्ज कर जांच शुरु की।

पुलिस के अनुसार सोमवार-मंगलवार की रात 1ः15 बजे इंदौर से गुना तरफ जा रही बालाजी बस क्रमांक यूपी 78 जीटी 3394 सदगुरु ढ़ाबा के सामने फ्लाई ओवरब्रिज से नीचे गिर गई। हादसे में बस में सवार 21 वर्षीय हरीओम कुशवाह निवासी घाटोली जिला अशोकनगर की मौत हो गई,

जो अपनी बहन को इंदौर से लेकर अशोकनगर जा रहा था वहीं एक अन्य 22 वर्षीय युवक की मौत हुई, जिसके परिजनों को सूचित किया गया है साथ ही बस में सवार 40 से अधिक लोग घायल हो गए, जिनमें दस से अधिक की हालत गंभीर बताई गई है।

सूचना पर पहुंचे प्रशासनिक व पुलिस अफसरों की मौजदूगी में घायलों को प्राथमिक चिकित्सा के बाद शाजापुर, इंदौर सहित अन्य जगह रेफर किया गया। पुलिस ने बस चालक के खिलाफ धारा 279, 337, 304ए, 184 एमव्ही.एक्ट के तहत प्रकरण दर्ज कर जांच शुरु की।


PostImage

pran

March 13, 2024   

PostImage

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तेजस फायटर जेटचा पहिला अपघात, पायलट सुरक्षित


वैमानिक सुखरूप बाहेर काढला, हवाई दलाने सांगितले की, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जैसलमेर/नवी दिल्ली:

 

 भारतीय वायुसेनेचे तेजस विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे प्रशिक्षणादरम्यान एका विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारात कोसळले. पायलट सुखरूप बाहेर पडला असून जमिनीवर कोणतीही दुखापत झालेली नाही.

 

 23 वर्षांपूर्वी 2001 मध्ये पहिल्या चाचणी उड्डाणानंतर स्वदेशी जेटचा हा पहिला अपघात आहे. तेजस हे हलके लढाऊ विमान 2016 मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते.

दुपारी दोनच्या सुमारास जैसलमेरमधील लक्ष्मी चंद संवल कॉलनीजवळ असलेल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जमिनीवर विमान कोसळले. वैमानिक सुखरूप बाहेर काढला, हवाई दलाने सांगितले की, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

"भारतीय वायुसेनेच्या एका तेजस विमानाचा आज जैसलमेर येथे ऑपरेशनल ट्रेनिंग सोर्टी दरम्यान अपघात झाला. पायलट सुखरूप बाहेर पडला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आली आहे," असे भारतीय वायुसेनेने सांगितले. एक्स वर.

अपघातानंतर विमानाला आग लागली, जी आता आटोक्यात आली आहे. हे विमान राजस्थानमध्ये सुरू असलेल्या युद्ध खेळाचा भाग होता की नाही हे स्पष्ट झालेले नाही

एका साक्षीदाराने सांगितले, "मी जवळच उभा होतो. विमानाचा पायलट बाहेर पडला आणि मला पॅराशूट उघडलेले दिसले. विमान जमिनीवर कोसळले आणि मोठा स्फोट झाला."

 

 2016 मध्ये तेजसचा समावेश करणारी पहिली IAF स्क्वॉड्रन क्रमांक 45 स्क्वॉड्रन होती, ज्याला 'फ्लाइंग डॅगर्स' म्हणूनही ओळखले जाते. 2020 मध्ये 18 क्रमांकाची स्क्वाड्रन तेजस चालवणारी दुसरी IAF युनिट बनली.

भारतीय हवाई दल सध्या 40 तेजस MK-1 विमाने चालवते आणि त्यांच्याकडे ₹ 46,000 कोटींहून अधिक किमतीच्या करारानुसार 83 तेजस MK-1A लढाऊ विमाने आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, संरक्षण अधिग्रहण परिषदेने दलासाठी अतिरिक्त 97 तेजस विमाने खरेदी करण्यास प्राथमिक मान्यता दिली होती.

 

 भारतीय नौदल देखील या विमानाचे ट्विन सीटर प्रकार चालवते.

 


PostImage

Ujjwala kale

Feb. 13, 2024   

PostImage

२० लाख कोटींचे मार्केट कॅप ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी आहे …


मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये तेजी कायम आहे. आज मंगळवारी बीएसईवर हा शेअर्स १ टक्क्यांहून अधिक वाढून २,९५७ रुपयांवर गेला. हा या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.तर हा शेअर्स २०२४ मध्ये आतापर्यंत सुमारे १४ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज २० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय सूचीबद्ध कंपनी बनली आहे. (Reliance Market Capitalisation)

 

रिलायन्स शेअर्सने मंगळवारी बीएसईवर २,९५७ रुपयांचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला. आज १३ फेब्रुवारी रोजी तो इंट्राडे १.८ टक्के वाढला. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हा शेअर्स १.३० टक्के वाढीसह २,९४० रुपयांवर होता.

 

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ऑगस्ट २००५ मध्ये १ लाख कोटी रुपये, एप्रिल २००७ मध्ये २ लाख कोटी रुपये, सप्टेंबर २००७ मध्ये ३ लाख कोटी रुपये आणि ऑक्टोबर २००७ मध्ये ४ लाख कोटी रुपयांवर होते. तेव्हापासून जुलै २०१७ मध्ये ५ लाख कोटी रुपयांवर बाजार भांडवल पोहोचण्यासाठी रिलायन्सला १२ वर्षे लागली. तर नोव्हेंबर २०१९ मध्ये बाजार भांडवल १० लाख कोटी आणि सप्टेंबर २०२१ मध्ये १५ लाख कोटींवर पोहोचले. त्यानंतर २० लाख कोटी रुपयांचा टप्पा सुमारे ६०० दिवसांत गाठला.

 

जानेवारीमध्ये हा शेअर्स १०.४ टक्क्यांनी वाढला. तर फेब्रुवारीमध्ये जवळपास ४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

 

आता रिलायन्स ही २० लाख कोटींवर बाजार भांडवल असलेली RIL ही भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी बाजार भांडवलात टीसीएस (१५ लाख कोटी रुपये), एचडीएफसी बँक (१०.५ लाख कोटी), आयसीआयसीआय बँक (७ लाख कोटी) आणि इन्फोसिस (७ लाख कोटी) च्या पुढे आहे. (Reliance Market Capitalisation)


PostImage

Ujjwala kale

Feb. 9, 2024   

PostImage

भारतीय हवाई दलासाठी Mahindra बनवणार लढाऊ विमाने ब्राझिलच्या कंपनीसोबत केला …


Mahindra Automobile: थार आणि स्कॉर्पिओसारखी वाहने बनवणारी भारतातील आघाडीची मोठी ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा (Mahindra) आता भारतीय हवाई दलासाठी विमाने बनवणार आहे. महिंद्राने ब्राझिलियन कंपनी एम्ब्रेरसोबत याबाबत करार केला आहे.आता या दोन्ही कंपन्या मिळून C-390 मिलेनियम मल्टीमिशन विमान बनवतील. विशेष म्हणजे, हे विमान पूर्णपणे भारतात बनवले जाईल.करार भारत सरकारच्या मध्यम वाहतूक विमान खरेदी प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे. हे विमान बनवण्याचा कारखाना भारतातच उभारला जाईल. भारतीय हवाई दल (Indian Air Force) या विमानाचा वापर करेलच. पण, त्यापेक्षा येथे तयार होणारी विमाने परदेशात निर्यात केली जातील आणि त्यातून भारताचा मोठा फायदा होईल. यामुळे देशातील संरक्षण विमान उद्योगाला चालना मिळणार आहे.

390 मिलेनियम हे मध्यम आकाराचे वाहतूक विमान आहे. याचे पहिले उड्डाण 3 फेब्रुवारी 2015 रोजी ब्राझीलमध्ये झाले होते. ते 2019 मध्ये या विमानाला सर्वांसमोर सादर करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत अशाप्रकारची 9 विमाने तयार करण्यात आली आहेत. या विमानाचा वापर ब्राझील, पोर्तुगाल आणि हंगेरीच्या हवाई दलांकडून केला जातोय.

हे विमान उडवण्यासाठी दोन पायलट आणि एक लोडमास्टरची गरज असते. 26 हजार किलोग्रॅम वजन किंवा 80 सैनिक किंवा 74 स्ट्रेचर आणि 8 अटेंडंट किंवा 66 पॅराट्रूपर्स सोबत घेऊन उडण्याची क्षमता या विमानात आहे. 115.6 फूट लांबीच्या विमानाची उंची 38.10 फूट आहे, तर विंगस्पॅन 115 फूट आहे.

 

 

 

या विमानात एकावेळी 23 हजार किलोग्रॅम इंधन वाहून नेले जाऊ शकते, म्हणजेच संपूर्ण उपकरणांसह एकावेळी 5020 किलोमीटरपर्यंत उड्डाण करण्याची क्षमता या विमानाची आहे.

 

 

 

विमानाचा कमाल वेग ताशी 988 किलोमीटर आहे. विमान कमाल 36 हजार फूट उंचीवर उडू शकते. या विमानात काही प्रमाणात शस्त्रेही बसवता येतात, पण हे विमान प्रामुख्याने बचाव कार्यासाठी बनवण्यात आले आहे.

 

 


PostImage

Ujjwala kale

Feb. 3, 2024   

PostImage

मराठीत हीरोला चेहरा नसतो. पण हिंदी सिनेसृष्टीत काय होतं 'अशोक …


Ashok Saraf On Marathi Movie-Hindi Movie Actor : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप उमटवली.त्यांनी फक्त विनोदीचं नव्हे तर गंभीर भूमिकाही साकारल्या. अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला. अशोक सराफ यांनी कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानंतर आता अशोक सराफ यांचा जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ते मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार विरुद्ध हिंदी चित्रपटसृष्टी याबद्दल बोलत आहेत.

 

अशोक सराफ यांनी 'चौकट राजा', 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका', 'आम्ही सातपुते', 'वेड' यांसारख्या अनेक चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. काही वर्षांपूर्वी अशोक सराफ यांनी सह्याद्री वाहिनीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ते हिंदी विरुद्ध मराठी कलाकारांमधील फरक सांगताना दिसत आहेत.

 

"मराठीत हिरोला चेहराच नाही"

 

यावेळी ते म्हणाले, "मराठीमध्ये हिरोला चेहराच नाही. हिरोला काम आहे. हिरोला अभिनय आहे. पण हिरोला चेहरा नाही. हिंदी सिनेसृष्टीत वेगळं आहे. हिंदीमध्ये चेहरा आहे. पहिल्यांदा चेहरा बघतात. मी कामाचं काहीही बोलत नाही. पण चेहरा हा महत्त्वाचं ठरतो. पण मराठीत कुठल्याही अभिनेत्याला चेहरा कधीच नसतो."

 

"मराठी प्रेक्षकांची एक वाखण्यासारखी गोष्ट म्हणजे ते तुम्ही कसे दिसता हा कधी विचारच करत नाही. तुम्ही काय काम करता ते आम्हाला सांगा. तुम्ही तिकडे काय करता, तुम्ही आम्हाला किती खूश करु शकता, तुम्ही किती चांगलं करुन दाखवू शकता हे आम्हाला दाखवा, तर तुम्ही आमचे हिरो. हा पूर्वापार आलेला नियम आहे. असा अमुक एक चेहऱ्याचा माणूस पाहिजे, असं मराठी चित्रपटसृष्टीत कधीच होत नाही. त्यांना कामाचं नेहमीच महत्त्व वाटत आलंय. तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे", असे अशोक सराफ यांनी म्हटले.दरम्यान अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम चॅनलने शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अशोक सराफ यांचा संपूर्ण जगभरात चाहतावर्ग आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनी छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांना 'अभिनय सम्राट' म्हणून ओळखले जाते.


PostImage

Ujjwala kale

Jan. 17, 2024   

PostImage

आता मुंबईचा मानाचा फिल्मफेअरही गुजरातने पळवला,करणं जोहरच्या घोशणेनंतर महाराष्ट्र संतापला.


Filmfare : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि मुंबईतले अनेक उद्योग गुजरातला नेले आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात असताना आता मुंबईचा मानाचा फिल्मफेअरही गुजरातमध्ये होणार आहे.जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 69 व्या Hyundai Filmfare Awards 2024 संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

 

हा पुरस्कार सोहळा गिफ्ट सिटी, गांधीनगर, गुजरात येथे होणार आहे. २०१८ पासून २०२३ पर्यंत प्रत्येक वर्षी फिल्मफेअर पुरस्कार हे मुंबईमध्ये आयोजित करण्यात येत होते. २०२० मध्ये हा सोहळा गुवाहाटी येथे झाला होता. मात्र आता २०२४ चा फिल्मफेअर सोहळा गुजरातला होणार आहे.

 

करण जोहर स्वतः या पुरस्कारसंध्येचे सूत्रसंचालन करणार आहे. पहिल्या दिवशी फॅशन शो आणि दुसऱ्या दिवशी अवॉर्ड फंक्शन आणि डान्स नाईट होईल. यामध्ये करीना कपूर खान, कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर, वरुण धवन, रणवीर सिंग यांचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.

 

तसेच करण जोहरसोबत मनीष पॉल आणि आयुष्मान खुराना हे शो होस्ट करताना दिसणार आहेत. फिल्म फेअरच्या पहिल्या दिवशी निखिल आणि शंतनूचा फॅशन शो आणि दुसऱ्या दिवशी अवॉर्ड नाईट होईल. तुम्हालाही या अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावायची असेल तर तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकता.

 

या कार्यक्रमाला हरित शुक्ला (IAS, प्रधान सचिव, पर्यटन, देवस्थानम व्यवस्थापन, नागरी विमान वाहतूक आणि तीर्थक्षेत्र, गुजरात सरकार), रोहित गोपकुमार (संचालक, टाइम्स एंटरटेनमेंट विभाग, वर्ल्डवाईड मीडिया, एंटरटेनमेंट टीव्ही आणि डिजिटल नेटवर्क) आणि जितेश पिल्लई (संचालक) उपस्थित होते.

 

फिल्मफेअरच्या 69 व्या आवृत्तीबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणाले, फिल्मफेअर पुरस्कारांच्या प्रतिष्ठित ६९ व्या आवृत्तीसाठी गुजरातमध्ये चित्रपट निर्मात्यांचे स्वागत करण्याची तयारी गुजरातने केली आहे. आम्हाला पर्यटनात वाढ आणि आमच्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे.

 

आम्ही गुजरातचे नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, मजबूत पायाभूत सुविधा तसेच आमचे सक्रिय प्रशासन आणि सिनेमॅटिक टुरिझम पॉलिसी आणि गुजरात टुरिझम पॉलिसी यांसारख्या धोरणांचे प्रदर्शन करण्यास देखील उत्सुक आहोत.

 

फिल्मफेअरबद्दल वरुण धवन म्हणाला, फिल्मफेअर अवॉर्ड्स हे भारतीय सिनेमाच्या हृदयाचे ठोके आहेत, जे अनेक कलाकारांना नवीन उंचीवर घेऊन जातात. जेव्हा मी माझ्या पहिल्या परफॉर्मन्सकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला दिसतं की गोष्टी बदलल्या आहेत.